Bollywood Actor : मुंबईत समुद्रकिनारी सुंदर घर, कोट्यवधींच्या गाड्या अन् 32 सिनेमे, बॉलीवूड अभिनेत्याची अब्जावधींची संपत्ती
अभिनेता शाहिद कपूर देखील त्यापैकी एक आहे. अभिनेत्याने नुकतच त्याच्या मुलांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहिद कपूरने आज त्याच्या नवीन अपार्टमेंटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची दोन मुले मीशा आणि झैन बाल्कनीत उभे आहेत आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनारी असलेल्या या घरातून अतिशय सुंदर दृश्य दिसत आहे.
शाहिद कपूर जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत आला तेव्हा तो चाहत्यांचा 'चॉकलेटी बॉय' होता. इतक्या वर्षांनंतरही चाहत्यांचे प्रेम कायम आहे. 2003 मध्ये 'इश्क विश्क' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहिदने 21 वर्षांच्या करिअरमध्ये 32 चित्रपट केले आणि कोट्यवधी रुपये कमावले.
मुंबईतील अनेक मालमत्ता, समुद्रकिनारी आलिशान अपार्टमेंट्स, अनेक महागड्या गाड्या अशी अब्जावधींची संपत्ती शाहिदची आहे.
शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत आणि दोन मुले मीशा आणि झैन यांनी गेल्या वर्षी जुहू येथील समुद्रकिनारी असलेले त्यांचे जुने अपार्टमेंट सोडले आणि वरळीतील एका नवीन आलिशान डुप्लेक्समध्ये तो शिफ्ट झाला.
शाहिदचे नवीन घर वरळीतील गगनचुंबी इमारती थ्री सिक्स्टी वेस्ट येथे आहे, जिथून वांद्रे-वरळी सी लिंकचे सुंदर दृश्य दिसते. या आलिशान डुप्लेक्सची किंमत 58 कोटी रुपये आहे. या जोडप्याने 2018 मध्ये डुप्लेक्स अपार्टमेंट बुक केले होते. एका रिपोर्टनुसार, शाहिदने आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून घर बदलण्याचा निर्णय घेतला होता.
वृत्तानुसार, शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी मुंबईत आणखी एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हे अपार्टमेंटही वरळीत असून त्याची किंमत 59 कोटी रुपये आहे. indextap.com च्या मते, हे अपार्टमेंट ओबेरॉय 360 वेस्ट प्रकल्पाचा भाग आहे.
शाहिद कपूरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो 265 कोटींचा मालक आहे. त्याची महिन्याची कमाई ही 3 कोटींहून अधिक आहे आणि तो एका वर्षात 30 कोटींहून अधिक कमावतो.
शाहिदच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या वाहनांचा समावेश आहे. यामध्ये Audi, BMW 7 Series, Lexus 470, Land Cruiser, Range Rover आणि Mustang यांचा समावेश आहे, ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे.
43 वर्षांचा शाहिद एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये घेतो.