किंग खानचा रोमान्स अन् हिरोईन्सच्या अदा आता Netflix वर; इमोशन्स, ड्रामाचा मसाला असलेले 'हे' चित्रपट एकदा पाहाच!
शाहरुख खानचे काही सुपरहिट चित्रपट आहेत, जे आता नेटफ्लिक्सवर पाहता येतील. 90s मध्ये लोकांनी किंग खानचे हे चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाहरुख खान आणि राणी मुखर्जी स्टारर 'चलते चलते' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा 'कभी अलविदा ना कहना' हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन आणि किरण खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांचा 'मैं हूं ना' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
नेटफ्लिक्सवर आता शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांचा 'दिल से' चित्रपट पाहू शकता. ही खास लव्हस्टोरी असून या चित्रपटासबतच यातील गाणी सुपरहिट झाली होती.
तुम्ही नेटफ्लिक्सवर शाहरुख खान आणि प्रीती झिंटा स्टारर 'कल हो ना हो' चित्रपट पाहू शकता.
शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल या त्रिकुटाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाचा समावेश देखील आहे. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवरही पाहता येणार आहे.