उफ तेरी अदा... 'पंचायत' फेम रिंकी रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस; वेस्टर्न लूकमधील फोटो पाहून व्हाल घायाळ
'पंचायत' सीरीजमधील प्रधानजींची मुलगी 'रिंकी'चा ऑनस्क्रीन साधा भोळा लूक प्रेक्षकांच्या खूपच मनात भरला. मात्र, 'पंचायत'मध्ये साधी भोळी दिसणारी साविका खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसान्विका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 490 हजार फॉलोअर्स आहेत. दररोज अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस फोटोंद्वारे सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
सान्विका ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी आहे. त्यांनी इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे.
सान्विकाला कधीच नोकरी करायची इच्छा नव्हती. सुरुवातीपासूनच तिचा अभिनयाकडे जास्त कल होता.
एका मुलाखतीदरम्यान तिने खुलासा केला होता की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी ती कुटुंबियांशी खोटे बोलून मुंबईत आली होती.
घरच्यांशी खोटं बोलून सान्विका मुंबईत पोहोचली, पण इथे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.
तिने हार मानली नाही, खूप मेहनत घेऊन तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्रेक मिळवला. यानंतर तिला टीव्ही इंडस्ट्री आणि जाहिरातींमध्ये काम मिळू लागले.
टीव्ही-जाहिरातींसोबतच, तिने 'हजमत' आणि 'लखन लीला भार्गव' सारख्या वेब सीरिजमध्येही काम केलं.
अनेक जाहिराती आणि वेब सीरिज केलेल्या सान्विकाला खरी ओळख TVF ची लोकप्रिय वेब सीरीज 'पंचायत' मधून मिळाली.
पंचायत सीरीजमध्ये तिने प्रधानजींच्या मुली भूमिका साकारली होती. 'रिंकी'च्या भूमिकेत तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे.
अभिनय कौशल्याच्या बळावर तिने वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.