PHOTO | संजय दत्त ते करण सिंह ग्रोव्हर, 'हे' कलाकार तीन वेळा विवाहबंधनात!
शाहिद कपूरची आई निलीमा अझीम यांनीही तीन लग्न केली. त्यांनी पहिलं लग्न अभिनेता पंकज कपूर यांच्यासोबत केलं होतं. तर दुसरं लग्न राजेश खट्टर यांच्यासोबत झालं. इशान खट्टर हा या दोघांचा मुलगा आह. तर तिसरा विवाह त्यांनी रजा अली खान यांच्यासोबत केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगायक लकी अलीने पहिलं लग्न न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या मेगन जेन मॅक्लेरीसोबत केलं होतं. दुसरी पत्नी इनायापासून त्याला दोन अपत्ये आहेत. त्याने तिसरं लग्न ब्रिटिश मॉडल केट एलिजाबेथ हॉलमसोबत केलं. तिच्यापासून त्याला दोन मुलं आहेत.
कबीर बेदी यांच्या स्टाईल आणि लूकची एकेकाळी सिनेसृष्टीत चर्चा होती. कबीर बेदी यांनी चार लग्न केली. पहिलं लग्न प्रोतिमा बेदी, दुसरं लग्न सुझॅन हम्फ्रीजसोबत, तिसरं लग्न टीव्ही प्रेझेंटर निक्कीसोबत तर चौथं लग्न परवीन दुसांजसोबत केलं.
कमल हासन यांचं पहिलं लग्न वाणी गणपतीसोबत झालं होतं. यानंतर ते सारिकासोबत विवाहबंधनात अडकले. यानंतर असंही वृत्त होतं की कमल हे गौतमी यांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी गुपचूक लग्नही केलं. परंतु याला दुजोरा मिळालेला नाही.
संजय दत्तने पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत केलं होतं. तर रिया पिल्लई ही त्याची दुसरी पत्नी होती. तिसरं लग्न त्यान मान्यता दत्तसोबत केलं. मान्यता आणि संजय आता आपल्या आयुष्यात फार आनंदी आहेत.
बिपाशा बासू ही करण सिंह ग्रोवरची तिसरी पत्नी आहे. बिपाशासोबत लग्न करण्याआधी करणने दोन लग्न केली होती. श्रद्धा निगमही त्याची पहिली पत्नी तर अभिनेत्री जेनिफर विंगेट ही त्याची दुसरी पत्नी होती.