'चूक झाली, माफी मागतो...', अलिबागकरांपुढे आदित्य नारायण नतमस्तक
छाया सौजन्य - आदित्य नारायण/ इन्स्टाग्राम
1/5
'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शो चा सूत्रसंचालक, आदित्य नारायण यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून अखेर अलिबागकरांच्या भावना दुखावल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आदित्यला त्यानं अलिबागविषय़ी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन निशाण्यावर घेतलं आहे. (छाया सौजन्य- आदित्य नारायण / इन्स्टाग्राम)
2/5
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सदर रिअॅलिटी शोमध्ये अलिबाग आणि तेथे राहणाऱ्या जनतेला वाईटपणे सर्वांसमक्ष मांडलं असल्यामुळे आदित्य नारायण यानं माफी मागावी अशी मागणी केली होती. (छाया सौजन्य- आदित्य नारायण / इन्स्टाग्राम)
3/5
आदित्यनं त्याच्या इन्स्ट्ग्राम स्टोरीच्या माध्यमातून यासंदर्भातील मेसेज करत जाहीर माफी मागितली. (छाया सौजन्य- आदित्य नारायण / इन्स्टाग्राम)
4/5
मी सहृदयपणे हात जोडून अलिबागकर आणि इतरांची माफी मागतो ज्यांच्या भावना माझ्यामुळे दुखावल्या गेल्या. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. अलिबागसाठी माझ्या मनात विशेष प्रेम आणि आदर आहे. या ठिकाणाशी, इथल्या लोकांशी माझ्याही भावना जोडल्या गेल्या आहेत, असं त्याने या पोस्टमधून लिहिलं. (छाया सौजन्य- आदित्य नारायण / इन्स्टाग्राम)
5/5
आदित्यनं हल्लीच पार पडलेल्या कार्यक्रमाच्या एका भागात स्पर्धकाशी संवाद साधताना अलिबागचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळं तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. (छाया सौजन्य- आदित्य नारायण / इन्स्टाग्राम)
Published at : 25 May 2021 01:04 PM (IST)