Samir Choughule: दहिसरच्या चाळीत बालपण, अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचं होतं करिअर; खळखळून हसवणाऱ्या समीर चौघुलेबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
अभिनेता समीर चौघुले (Samir Choughule) हा गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमीरनं अनेक चित्रपट आणि कार्यक्रमामध्ये काम केले. समीर हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.
एका मुलाखतीमध्ये समीर चौघुलेनं सांगितलं होतं की त्याला अभिनय नाही तर क्रिडा क्षेत्रात करिअर करायचं होतं. तो म्हणाला, 'मी आधी स्पोर्ट्समन होतो. मी शाळेत असताना खो-खो, कबड्डी टीमचा कॅप्टन होतो.'
समीरनं त्याच्या पहिल्या नाटकाबद्दल देखील सांगितलं होतं. तो म्हणाला, 'माझं पहिल्या नाटकामध्ये मी प्रेक्षकांना बघितल्यानंतर डायलॉग विसरलो होतो. तेव्हा मी थरथर कापत होतो. विंगेतून सर मला डायलॉग म्हणायला सांगत होते. नंतर मी मला सरांनी डायलॉग सांगितल्यावर मी तो डायलॉग घेतला. त्यानंतर मी रडलो होतो. तो अनुभव खूप वाईट होता.'
समीर चौघुले पुढे सांगितलं, 'माझी आई कोर्टात कामाला होती. माझे बाबा एका कंपनीमध्ये काम करत होते.आम्ही दहिसरला चाळीत राहात होतो. त्यानंतर नालासोपऱ्यात माझ्या बाबांनी घर घेतलं. तिकडे आम्ही शिफ्ट झालो. बालपणी मी खोडकर होतो.'
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो बरोबरच समीरनं जग्गू आणि ज्युलिएट, चंद्रमुखी, मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये काम केले आहे
समीरची एका काळेचे मणी ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
समीर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असतो.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे समीरला विशेष लोकप्रिया मिळाली.