सलमान खानआधी अल्लू अर्जूनला मिळालेला 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपटाची, ऑफर नाकारण्याचं कारण काय?
'मैने प्यार किया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा 'प्रेम' आता बॉलिवूडचा 'दबंग' झाला आहे. सलमान खानने अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूपरहिट ठरले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खानने हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. यामधीलच एक हिट चित्रपट म्हणजे 'बजरंगी भाईजान'.
बजरंगी भाईजान बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बजेटच्या दहा पट कमाई केली होती. पण तुम्हाला माहित आहे का की, सलमानच्या आधी हा चित्रपट 'पुष्पा' फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ऑफर झाला होता. पण त्याने हा चित्रपट नाकारला. याचं कारण जाणून घ्या.
2015 मध्ये रिलीज सलमान खानच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' चित्रपटाची कथा लोकांना खूप आवडली याशिवाय प्रेक्षकांनी सलमानच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं.
दरम्यान, 'बजरंगी भाईजान' चित्रपटासाठी सलमान खान पहिली पसंत नव्हता. या चित्रपटासाठी आधी अल्लू अर्जुनला ऑफर देण्यात आली होती.
अभिनेता अल्लु अर्जुनला 'बजरंगी भाईजान' चित्रपट ऑफर करण्यात आला, त्यावेळी हो दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता, यामुळे त्याने सिनेमाची ऑफर नाकारली.
अल्लू अर्जुननंतर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही 'बजरंगी भाईजान' चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण आमिरला स्क्रिप्टमध्ये काही बदल हवे होते, जे निर्मात्यांना आवडले नाहीत.
या दोन स्टार्सनी नाकारल्यानंतर कबीर सिंगचा हा चित्रपट सलमान खानपर्यंत पोहोचला. त्याने हा चित्रपट नाकारल्यानंतर तो सलमान खानला मिळाला. जी ऑफर त्याने स्वीकारली आणि ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिला.
हा चित्रपट 90 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. जो, रिलीज झाल्यानंतर, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आणि जगभरात हिट झाला.
हा चित्रपट 90 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. जो, रिलीज झाल्यानंतर, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आणि जगभरात हिट झाला.
Sacnilk च्या मते, 'बजरंगी भाईजान' चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 320.34 कोटी रुपये आणि जगभरात 922.17 कोटी रुपये कमावले होते. हा आकडा बजेटपेक्षा 10 पट जास्त होता.
सध्या अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील सलमान खानचा फर्स्ट लूकही समोर आला, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला. आता सिकंदर चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.