IPO Update : आयपीओंनी गाजवलं 2024 हे वर्ष, 1.8 लाख कोटी रुपयांची उभारणी, सर्वाधिक परतावा कोणत्या IPO नं दिला?
भारतीय शेअर बाजारात 2024 मध्ये जवळपास 300 हून अधिक आयपीओ लिस्ट झाले. यामध्ये मेनबोर्ड आयपीओ आणि एसएमई आयपीओचा समावेश आहे. दोन्ही प्रकारच्या आयपीओंनी मिळन 1.8 लाख कोटी रुपये उभारले. 2021 मध्ये आयपीओतून 1.3 लाख कोटी रुपये उभारले गेले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविभोर स्टील ट्यूब्सचा आयपीओ 195 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. या आयपीओचा किंमतपट्टा 151 रुपये होता, तो 446.25 रुपयांना लिस्ट झाला. त्यानंतर शेअर घसरुन 211.3 रुपयांवर पोहोचला. हा आयपीओ 320 पट सबस्क्राइब झाला.
बीएलएस ई सर्व्हिसेसचा आयपीओ 170 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. किंमतपट्टा 135 रुपये होता. लिस्टिंगनंतर शेअर घरला सध्या 199.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. ममता मशिनरीच्या आयपीओनं 159 टक्के लिस्टिंग गेन दिला. किंमतपट्टा 243 रुपये होता लिस्टिंग 630 रुपयांना झालं. सध्या शेअर 598.5 रुपयांवर आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओनं धमाकेदार एंट्री केली. किमंतपट्टा 70 रुपये होता. शेअर 165 रुपयांवर लिस्ट झाला आता तो 127.55 रुपयांवर ट्रेड होत आहे. केआरएन हीट एक्सेंजरच्या आयपीओनं लिस्टिंगला 118 टक्के लिस्टिंग गेन दिला. या आयपीओचा किंमपट्टा 220 रुपये होता. लिस्टिंग 480 रुपयांना झालं. सध्या हा शेअर 700 रुपयांवर आहे.
दीपक बिल्डर्स अँड इजीनिअर्स, जेजी केमिकल्स, एसएमई सोलर होल्डिंग्ज,जनस्मॉल फायनान्स बँक, ईपॅक ड्यूरेबल्सचा हे आयपीओ लिस्टिंग होताना निश्चित केलेल्या इशू प्राइस पेक्षा कमी किंमतीला झाले. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)