मानेवर 10 सेमीची जखम, पाठीत धारदार शस्त्र खुपसलं; अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला
अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी चोरट्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास चाकू हल्ला झाला.
चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफ अली खानला लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
अज्ञाताने चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
हल्लेखोराने सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये सैफच्या मानेवर खोलवर जखम झाली. हल्ल्यात सैफच्या पाठीत धारदार शस्त्र घुसलं होतं, जे तातडीनं शस्त्रक्रिया करुन काढण्यात आलं, त्यानंतर आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
हल्ला झाला त्यावेळी सैफ अली खानसोबत करीना कपूर, दोन मुले आणि इतर कर्मचारी घरात होते.
पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.