Salman Khan Kissa: 'सुल्तान'च्या सेटवर धायमोकलून रडू लागला होता सलमान; सर्वांची उडाली होती तारांबळ, नेमकं काय घडलेलं भाईजानसोबत?
सलमान खान केवळ बॉलिवूडमधील टॉप स्टार्समध्येच नाही, तर तो 100 कोटींच्या क्लबचा टप्पा अनेकदा ओलांडणारा सेलिब्रिटी देखील आहे. पण सलमान त्याचे चित्रपट हिट होण्यासाठी खूप मेहनत घेतो. एरव्ही रागिट, गर्विष्ठ वाटणारा सलमान खान तेवढाच हळवासुद्धा आहे, याचा प्रत्यय 'सुल्तान'च्या चित्रिकरणादरम्यान आला. 'सुल्तान'च्या चित्रिकरणावेळी सलमान खान ढसाढसा रडू लागला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2016 मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'सुलतान' हा चित्रपट केवळ बंपर हिट ठरला नाही तर, सलमानच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानला जातो. फक्त 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, सलमान खानसाठी सर्वात कठीण काम म्हणजे, कुस्तीच्या शॉट्समध्ये लंगोट नेसणं. चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात सलमान खाननं स्वतः याबद्दल सांगितलं होतं.
सलमान खान म्हणाला की, सर्वात कठीण काम म्हणजे, लंगोट घालणं. स्विमसूट घालताना अभिनेत्रींना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे मला त्यावेळी कळलं. जेव्हा मला लंगोट नेसायला सांगितलं गेलं, त्यावेळी मला वाटलं की, ते सहज शक्य होईल.
सलमाननं सेटवरचा किस्सा सांगताना सांगितलं की, ज्यावेळी मी लंगोट घालून वॅनिट व्हॅनमधून बाहेर निघालो, त्यावेळी तिथे पाच हजार लोकांची गर्दी होती. मी लाजेनं पुरता मेलो होतो आणि अचानक मला रडू कोसळलं. शर्ट काढताना मला कधीच कोणची लाज वाटली नाही, पण त्यावेळी लंगोट नेसून शूट करताना मला प्रमाणापलिकडे लाज वाटली. हे करणं माझ्यासाठी फारच कठीण होतं.
कुस्तीच्या पार्श्वभूमीवर बनलेला सुल्तान हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सलमान खाननं कुस्तीगीर सुल्तानची भूमिका साकारली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर हिट ठरला.
या ब्लॉकबस्टर चित्रपटात अनुष्का शर्मा सलमान खानसोबत दिसली होती. चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडली. चित्रपटातील गाण्यांनी तर सर्वांना थिरकायला भाग पाडलं.
दरम्यान, सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जो यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.