Sai Pallavi Photo : निखळ सौंदर्याची खाण! साई पल्लवीच्या रुपाची चाहत्यांना भुरळ
दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) हिला सौंदर्याची खाण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाई पल्लवीचे निरागस रुप, निखळ सौंदर्य, घायाळ करणारं स्मित हास्य याने चाहत्यांच्या मनावर वेगळं विश्व निर्माण केलंय. साई पल्लवीचा लूक सालस, सोज्वळ असला तरी या साध्या लूकमुळे तिने अनेकांना वेडं लावलंय.(सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)
केवळ 29 वर्षाच्या असणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'प्रेमम' (Premam) हा साई पल्लवीचा पहिलाच चित्रपट अद्यापही अनेकांच्या काळजात घर करुन आहे. (सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)
साई पल्लवीने आतापर्यंत तामिळ, तेलुगू आणि मळ्यालम चित्रपटांत काम केलं आहे. तिने 'मारी' (Maari) सारखा सुपरहिट चित्रपटही दिला आहे. (सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)
साई पल्लवी नेहमी पारंपारिक अंदाजात दिसते. साडीमध्ये साई पल्लवीचे सौंदर्य अधिकच खुलते. साई पल्लवीची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे तिचे कुरळे केस.(सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)
साई पल्लवीचा विना मेकअप किंवा कमी मेकअप लूक चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतो. चित्रपटातही काम करतानाही बऱ्याच वेळी ती मेकअप करत नाही.(सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)
साई पल्लवीने स्वत:ला काही तत्वांमध्ये बांधून घेतलंय. ती कोणत्याही सौंदर्यप्रसाधनाच्या जाहिरातीत काम करत नाही. (सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)
साई पल्लवीने सांगितले की, तिच्या कुंटुंबातही सावळ्या रंगाच्या महिला आहेत. त्यामुळे ती कोणत्याही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत काम करत नाही. (सौजन्य - साई पल्लवी इस्टाग्राम)