Govinda Birthday : आलिशान घर ते लग्झरी कार; जाणून घ्या गोविंदाच्या संपत्तीबाबत
(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
1/14
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज 58 वा वाढदिवस. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
2/14
गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईमध्ये झाला. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
3/14
गोविंदाची आई निर्मला देवी (Nirmala Devi) या अभिनेत्री आणि गायिका होत्या. तर त्याचे वडील अरुण आहूजा (Arun Ahuja) हे अभिनेते होते. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
4/14
जवळपास 30 चित्रपटांमध्ये गोविंदाने हिरोची भूमिका साकारली. 1997 मध्ये एका मुलाखतीत गोविंदाने त्याच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले होते. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
5/14
गोविंदाचे वडील अरुण आहूजा यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे गोविंदाच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
6/14
गोविंदाच्या वडीलांने कार्टर रोड येथील त्यांचा बंगला विकला. त्यानंतर ते विरार येथील एका चाळीमध्ये राहायला लागले. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
7/14
बालपणी येणाऱ्या अडचणींबद्दल एका मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले होते. त्यानं सांगितले की, 'मी दुकानात सामान घ्यायला जात होतो तेव्हा दुकानदार मला कित्येक तास दुकाना बाहेर बसायला लावत असे. कारण माझ्याकडे त्या दुकानदाराला देण्यासाठी पैसे नव्हते. मी उधारीवर सामान आणत होतो. एकदा आईने मला दुकानात जाऊन सामान आणायला सांगितले तेव्हा मी आईला नकार दिला. त्यावेळी घरातील परिस्थितीमुळे आई आणि मला अश्रू अनावर झाला होते. ' (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
8/14
गोविंदाने 1986 मध्ये इल्जाम या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
9/14
हीरो नंबर 1, हसीना मान जाएगी, दीवाना मस्ताना, बड़े मियां छोटे मियां आणि पार्टनर या चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले.(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
10/14
रिपोर्टनुसार, गोविंदाकडे एकूण 135 कोटी रूपये इतकी संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी गोविंदा 5 ते 6 कोटी मानधन घेतो. गोविंदा एकूण तीन बंगल्यांचा मालक आहे.(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
11/14
सध्या गोविंदा त्याच्या कुटुंबासोबत ज्या घरात राहतो, त्या घराची किंमत 16 कोटी रूपये आहे. तसेच गोविंदाकडे जवळपास 64 लाख रूपये किंमत असणारी मर्सिडीज बेंज जीएलसी गाडी आहे(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
12/14
त्याच्याकडे मर्सिडीज सी220D ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 43 लाख आहे. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
13/14
11 मार्च 1987 रोजी गोविंदाने सुनिता मुंजालसोबत लग्न केले. (Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
14/14
सुनिता आणि गोविंदा यांनी टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत.(Photo:@HeroNumber1.Govinda/FB)
Published at : 21 Dec 2021 10:42 AM (IST)