Richest Bollywood Actress : बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, 'या' सुपरस्टारकडे आहे बक्कळ पैसा
भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून तुम्ही दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा किंवा आलिया भट या नावांचा तुम्ही विचार करत असाल, तर तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभिनेत्रींचा समावेश देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत होत नाही, हे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल पण हे खरं आहे.
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
हुरुन रिच लिस्ट 2024 (Hurun Rich List 2024) नुसार, जुही चावला सध्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.
2024 च्या हुरुन श्रीमंतांच्या यादीनुसार, अभिनेत्री जुही चावलाकडे 580 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 4600 कोटींची संपत्ती आहे.
संपत्तीच्या बाबतीत तिने अनेक अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे.
2009 पासून जुही चावलाचा बॉक्स ऑफिसवर एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, तसं असलं तरीही ती सध्याच्या टॉप अभिनेत्रींना मागे टाकत सर्वात श्रीमंत बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.
बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आहे. ऐश्वर्याची नेटवर्थ सुमारे 850 कोटी आहे.
यानंतर बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.