Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' 3 राशींना लागणार जॅकपॉट, तिजोरीत होईल दुप्पट वाढ
धनत्रयोदशीला बुध, शुक्र आणि गुरु मिळून त्रिग्रही योग जुळून येणार आहे. यामुळे अनेक राशींना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी नारायण योगही आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीच्या दोन दिवसाआधीपासून धनत्रयोदशी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, यावर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, धनत्रयोदशीचा काळ अनेक राशींसाठी शुभ आहे. कारण या दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करुन शुक्र ग्रहाबरोबर युती करणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे.
मेष रास - धनत्रयोदशीच्या दिवशी जुळून येणाऱ्या त्रिग्रही योगाचा लाभ मेष राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. तसेच, उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील.
मिथुन रास - बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी बुधाचं राशी परिवर्तन फार शुभ असमार आहे. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील.
सिंह रास - सिंह राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा काळ फार शुभ असणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तसेच नवीन वाहन, प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळेल.
तूळ रास - धनत्रयोदशीच्या दिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल. तुमचं प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)