अमृता सिंग ते नीना गुप्तापर्यंत बॉलिवूडच्या 'या' सुंदर अभिनेत्रींचे क्रिकेटपटूंबरोबर राहिले प्रेमसंबंध
नगमा-सौरभ गांगुली: सन 2000 मध्ये नगमा आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील अफेअरविषयी बर्याच बातम्या येत होत्या. मात्र, सौरभ आणि नगमा दोघेही त्यांच्या नात्याबाबत कधीच माध्यमांशी बोलले नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरवी शास्त्री-अमृता सिंह: एक काळ असा होता की अमृता आणि रवि शास्त्री यांचे प्रेमसंबंध सर्वत्र होते. त्यावेळी रवी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता आणि अमृता बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. हे नातं फार काळ टिकू शकले नाही.
इमरान खान-झीनत अमान: पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचे नावही 80 च्या दशकात चर्चेत आले होते. मीडिया रिपोर्टनुसार झीनत अमानची इम्रानशी पहिली भेट पाकिस्तानात झाली होती. या दोघांनीही एकमेकांना ह्रदय दिले होते. पण, झीनत आणि इम्रानच्या नातंही फार काळ टिकू शकले नाही.
युवराज सिंग-किम शर्मा: एक काळ होता जेव्हा युवराज आणि किम एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही मीडियामध्ये येत असत, पण अचानक किम आणि युवराजच्या ब्रेकअपने सर्वांना चकित केले.
नीना गुप्ता-विव्हियन रिचर्ड्स: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचा फलंदाज विव्हियन रिचर्ड्स यांच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये बराच काळ चर्चा होती. 80 च्या दशकात विव्हियनची टीम जेव्हा भारतात आली तेव्हा दोघे प्रथम भेटले आणि प्रेमात पडले. निना आणि व्हिव्हियनला मसाबा गुप्ता नावाची एक मुलगी आहे. पण, या दोघांनी कधीही लग्न केले नाही.