विराट कोहलीने अनुष्का शर्माला लग्नासाठी प्रपोज केलचं नाही; हे सांगितले कारण
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची लव्ह स्टोरीदेखील कमी इंटरेस्टिंग नाही. एका मुलाखतीत विराटने स्वतः अनुष्कासोबतची पहिली भेट कशी होती हे उघड केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराटने सांगितले की, अनुष्कासोबत त्यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. अनुष्काला भेटण्यापूर्वी विराट बराच घाबरला होता. जेव्हा अनुष्का त्याच्या समोर आली, तेव्हा तिला पाहून तो स्तब्ध झाला. अनुष्काची उंची जास्त होती, हे पाहून.. तुला याहून उंच हिल्स नाही मिळाले का? अशी कमेंट विराटने केली.
हे ऐकून अनुष्का संतापू विराटला म्हणाली, एक्सक्यूज मी? त्यानंतर विराटला आपली चूक लक्षात आली. मस्करी करण्याच्या नादात आपण चुकीचं बोलल्याची जाणीव त्याला झाली.
यानंतर दोघांचे संभाषण सुरू झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विराटने सांगितले की त्याने अनुष्काला कधीही प्रपोज केले नाही. कारण दोघांनाही ठाऊक होते की त्यांनी एकमेकांशी लग्न करावे.
दोघांनी इटलीमधील टस्कनी येथे अतिशय गुप्तपणे लग्न केले. त्यांनी अचानक लग्न करून सर्वांना चकित केले. विराटने सांगितले की अनुष्काने लग्नाचे संपूर्ण नियोजन केले होते आणि लग्नाला गुप्त ठेवण्यासाठी बनावट आयडी आणि नावे वापरली होती.
या दोघांच्याही लग्नाला जवळपास साडेतीन वर्षे उलटून गेली असून यावर्षी 11 जानेवारीला दोघेही आपल्या मुलीचे पालक झाले आहेत, जिचे नाव त्यांनी वामिका ठेवले आहे.