Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचे शिक्षण किती? तिच्याकडे किती पदव्या आहेत?

नॅशनल क्रॅश म्हणून ओळखली जाणारी साऊथची सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रश्मिकाच्या साधेपणामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे ती आज तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

सध्या रश्मिका तिच्या बहुप्रतिक्षित 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती रणबिर कपूरसोबत दिसणार आहे.
वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणारी रश्मिका मंदाना अभ्यासातही चांगली होती.
रश्मिकाने तिचे शालेय शिक्षण कर्नाटकातील 'कूर्ग पब्लिक स्कूल'मधून केले. त्यानंतर तिने प्री-युनिव्हर्सिटी कोर्स करण्यासाठी म्हैसूरच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स'मध्ये प्रवेश घेतला.
'पुष्पा'च्या श्रीवल्लीने तिचे कॉलेज बंगळुरू येथून केले. त्यांनी 'एमएस रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स'मध्ये प्रवेश घेतला.
रश्मिकाने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्य अशा तीन पदव्या मिळवल्या.
रश्मिकाच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये, 2014 मध्ये क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. यानंतर तिने हळूहळू मॉडेलिंगच्या जगतात प्रवेश केला. सध्या तिच्या नावाचा समावेश इंडस्ट्रीतील महागड्या अभिनेत्रींमध्ये होतो.
रश्मिकाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2016 मध्ये कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'मधून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्यानंतर रश्मिकाने मागे वळून पाहिलेच नाही.