राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.
पुढील तीन दिवस विदर्भासह खान्देशात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे.
संपूर्ण विदर्भातील 11 आणि खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगांव अशा तीन जिल्ह्यासहित एकूण 14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील तीन दिवस म्हणजे 1 डिसेंबरपर्यंत कायम आहे. तर मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मात्र शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे.
7 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमानात घट होणार आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर असे 7 जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 29 जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा 4 डिग्रीने कमालीची घसरण जाणवत आहे.
2 डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.