‘एकविसाव्या शतकातील खिलजी’: रणवीर सिंहच्या Gucci फोटोशूटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अनोख्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. मात्र, अनेकदा त्याच्या या अनोख्या फॅशनमुळे सोशल मीडियावर तो ट्रोलही झाला आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. (photo : @ranveersingh instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफॅशन ब्रँड Gicci ने डिझाईन केलेला पोशाख रणवीर सिंहने घातला असून बॉलिवूडसह अनेक नेटकऱ्यांनी यावर भाष्य केलं आहे.(photo : @ranveersingh instagram)
या फोटोंनंतर रणवीरचे मीम्स व्हायरल होत असून लोकांनी पुन्हा एकदा दीपिका पादुकोणवर दया व्यक्त केलीय.(photo : @ranveersingh instagram)
रणवीरने चमकदार निळ्या रंगाच्या पोशाखात सोनेरी हार आणि नाट्यमय लांब केसांचा लूक केला आहे. आलिया भट्ट, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पोस्टवर भाष्य केले.
रणवीरच्या फोटोंमध्ये ज्या गोष्टीचे लक्ष वेधले गेले ते म्हणजे रणवीरचे लांब केस, जे त्याच्या खांद्याखाली दिसत आहे.
रणवीरने हा लूक खऱ्या आयुष्यात लांब केसांचा आदर करणार्या गुच्चीच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर अॅलेसॅन्ड्रो मिशेल यांना समर्पित केला आहे. जे वास्तविक जीवनात लांब केसांचे समर्थन करतात.
लिंगासंबंधी विशिष्ट फॅशनच्या नियमांचे उल्लंघन करत रणवीरने या खास फोटोशूटसाठी गुच्चीच्या जॅकी 1961 च्या कलेक्शनमधून सोन्याचे हार आणि हँडबॅग घातला होता.
अपेक्षेप्रमाणे, नेटकऱ्यांनी रणवीरवर अनेक मीम्स तयार केले.
एकाने लिहिले, हे पाहून दीपिकाचे वाईट वाटले.
तर एक जण म्हणाला रामदेव बाबांशी स्पर्धा करतोय. एकाने लिहिले, 21 व्या शतकातील खिलजी कसा दिसत असेल येथे पाहा. एकाने लिहिलय की फक्त इन्फ्लुएन्सरसाठी नवीन पीपीई किट बाजारात आलं आहे.