Nashik Rains : नाशिकच्या अनेक भागात रात्रभर मुसळधार, शेतकऱ्यांना दिलासा; अनेक भागांत पाणी साचले!
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप सुरु असून अशातच काल रात्रभर त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या दोन ते तीन दिवसांपासून मान्सूनचे जोरदार आगमन नाशिकसह जिल्ह्यातील काही भागांत झाले आहे. दिवसभर रिपरिपसह रात्री जोरदार पाऊस बरसत आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरु असून सकाळपर्यंत पाऊस सुरूच आहे.
रात्रभर पाऊस सुरु असल्याने, नाशिक शहरातील अनेक नाल्याना पाणी लागले आहे. तर अनेक भागात रस्त्याची दूरवस्था झाल्याचे चित्र आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून इगतपुरी परिसराला देखील झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतात पाणी साचल्याचे चित्र आहे.
गेल्या महिनाभरापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक भागांत भात पेरणीला सुरुवात झाली आहे.
मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश भागांत पेरण्या खोळंबल्या होत्या, त्या पूर्ण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खोळंबलेली भात पेरणी सुरु झाली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. जून महिन्यात पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पेरणी सुरु होत असते.
मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतीत होता.अखेर पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भात पेरणीला वेग आला आहे. त्याचबरोबर इतरही पिकांची लागवड केली जात आहे.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत शेतात पाणी साचले असून नाले देखील वाहू लागले आहेत.