Ram Charan Meets Eknath Shinde: राम चरण आणि उपासना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली; पाहा फोटो
दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सून वृषाली यांनी हळदी कुंकू लावून स्वागत केले.
राम आणि उपासना यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. राम चरण आणि उपासना यांचे स्वागत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांतही उपस्थित होता, त्यामुळे दोन्ही कुटुंबातील बंध आणखी घट्ट झाला.
राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत काही फोटो शेअर केले आहेत.
राम चरणनं एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, आदरणीय मुख्यमंत्री गुरू, श्रीकांत शिंदे गुरू आणि महाराष्ट्रातील चैतन्यशील लोकांनो, तुमच्या आदरातिथ्याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
शिंदे कुटुंबीयांनी राम आणि उपासना यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
राम चरणनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो हातात पुष्पगुच्छ दिसत आहे.
राम चरण काही दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलीसोबत मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं. मंदिरातील राम, उपासना आणि कालिन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.