Photo : लसणाचे दर 400 रुपयांच्या वर
सध्या लसणाच्या दरात (Garlic Prices) चांगलीच वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही आठवड्यात देशातील किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 300 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत.
सर्वसामान्यांच्या घरचे बजेट कोसळले आहे. त्याचवेळी घाऊक बाजारात लसणाची किंमत 150 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.
डाळी, तांदूळ आणि कांद्याच्या वाढत्या किमतींमुळं आधीच लोकांचे बजेट कोलमडले आहे. अशातच सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
कांद्याच्या दरात घसरण होत आहे. मात्र, सध्या लसणाच्या भावात वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लसणाच्या किंमती वाढ होण्यामागं दोन कारणे आहेत.
प्रथमत: यंदा खराब हवामानामुळे लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ही मुख्य लसूण उत्पादक राज्ये आहेत. येथील अवकाळी पावसाचा लसूण पिकावर विपरीत परिणाम झाला आहे.
खरीप पिकाच्या काढणीला उशीर झाल्यानं पुरवठा साखळीवरही विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम लसणाच्या दरावर दिसून येत आहे.
जानेवारी अखेरपर्यंत किरकोळ बाजारात लसणाची किंमत प्रतिकिलो 250 ते 350 रुपयांच्या दरम्यान राहू शकते, अशी माहिती व्यापाऱ्यांनी सांगितली.