Raksha Bandhan : रणबीर-रिद्धीमा ते अभिषेक-श्वेता... बॉलिवूडमधील या भावंडांचा एकमेकांवर प्रचंड जीव, पाहा फोटो
रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्याचा सण. काळाच्या ओघात, सणाचे स्वरूपही बदलले आहे आणि राख्या आणि भेटवस्तू सुद्धा. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आजच्या दिवशी आपल्या भाऊ-बहिणींसाठी वेळ राखून ठेवतात. बॉलिवूडमधील भावंडांबद्दल आज जाणून घेऊया?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्तिक आर्यन आणि कृतिका अशी दोन भावंडे आहेत जी सतत चर्चेत असतात. दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या मजेदार व्हिडिओंसाठी चाहत्यांचे आवडते आहेत. कार्तिकच्या इन्स्टाग्रामवर कोकी पुछेगा या व्हिडिओमध्ये दोघेही खूप मजा करताना दिसतात. यावेळी कार्तिकने आपल्या बहिणीच्या वाढदिवसाला स्वतःच्या हातांनी केक तयार केला होता.
प्रियंका चोप्रा- सिद्धार्थ चोप्रा यांचे भाऊ आणि बहिणीपेक्षा मित्र मैत्रिण म्हणून अधिक घट्ट संबंध आहेत.
टायगर श्रॉफ आणि कृष्णा बॉलिवूड शहरातील सर्वात कूल भावंडे असल्याचे म्हटले जाते. दोन्ही भावंडे फिटनेस फ्रिक आहेत आणि सोशल मीडियावर फोटोंद्वारे ते व्यक्त करत राहतात. बऱ्याच वेळा टायगर त्याच्या बहिणीच्या पोस्टवरही वेगवेगळ्या कमेंट करत असतो.
अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांचं नातंही खुप घट्ट आहे. ते मिळून प्रोडक्शन हाऊस देखील सांभाळतात. अलीकडेच, या प्रोडक्शन हाऊसच्या पाताललोक या वेब शोची बरीच चर्चा होती. एका मुलाखतीदरम्यान अनुष्का म्हणाली कर्णेश माझ्यासाठी स्टार आहे.
रणबीर कपूर- रिद्धिमा कपूर एकमेकांच्या खूप जवळ आहेत. वडील ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. दोघे भावंडे आजही एकमेकांची थट्टा मस्करी करताना दिसतात.
अभिषेक बच्चन- श्वेता नंदा या दोघांमध्येही खुप जवळीक आहे. दोन्ही भावंडे एकमेकांचे गुपित उघड करण्यात मागे नाहीत. कॉफी विथ करण शोमध्ये असेच काहीसे दिसून आले.
सैफ अली खान- सोहा अली खान हे दोघेही एकमेकांची खूप काळजी घेतात आणि वेळोवेळी भेटत राहतात.
अर्जुन कपूर- अंशुला कपूर यांच्या नात्यातही गोडवा आहे. दोन्ही भावंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच अंशुलानेअर्जुनसाठी लिहिले होते की, तो माझा आवडता व्यक्ती आहे आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. अर्जुनसाठी एक विशेष टीप शेअर करताना अंशुलाने लिहिले की अर्जुन माझा पालक, संरक्षक, मित्र आहे. तो माझा आत्मविश्वास आणि लाईफ लाईन आहे.
सलमान खान- अर्पिता खानसाठी भाऊ कमी आणि वडील अधिक आहे. सलमान अर्पिताबाबत खुप प्रोटेक्टिव्ह आहे. अर्पिताचा देखील सलमानवर खुप जीव आहे. कदाचित याच कारणामुळे सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्पिताने तिच्या दुसऱ्या मुलाची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला होता.