अक्षय कुमारपासून ते आर माधवनपर्यंत दिग्गजांचे चित्रट होणार रिलीज, जाणून घ्या कधी, कुटे पाहता येणार?
येत्या 26 जानेवारीपर्यंत अनेक बडे चित्रपट चित्रपटगृहांत तसेच वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मसवर रिलिज होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात अक्षय कुमारच्या स्काय फोर्स या चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट येत्या 24 जानेवारी रोजी चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान, निम्रत कौर, वीर पहाडिया यांच्यासह इतरही अनेक बडे कलाकार आहेत.
मिथिला पालकर आणि अमोल पाराशर यांचा 'स्वीट ड्रीम्स' हा चित्रपट येत्या 24 जानेवारी रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.
'हिसाब बराबर' हा चित्रपट झी-5 या ओटोटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट येत्या 24 जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटात आर माधवन, कीर्ति कुल्हारी, अनिल पांडे, महेंद्र राजपूर, फैजल राशिद, बॉन्डिप शर्मा आणि रश्मि देसाई दिसणार आहेत.
कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर 'लाफ्टर शेफ्स' या कार्यक्रमाचा दुसरा सिझन पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम 25 जानेवारीपासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित केला जाईल.