परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Rajesh Khanna Grand Daughter Naomika Saran Viral Video : बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची नात नाओमिका सरन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला पोहोचलेली डिंपल कपाडिया आणि तिच्या नातीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडियाची नात नाओमिका सरन आजीसोबत स्कायफोर्स चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दिसली. नाओमिकाला पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले. या स्टार किडचे फोटो सोशल मीडियावर खूपर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची धाकटी मुलगी रिंकी खन्ना हिची मुलगी नाओमिका सरन चर्चेत आली आहे. स्कायफोर्सच्या स्क्रीनिंगमधील तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
राजेश खन्ना यांच्या नातीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. स्काय फोर्सच्या स्क्रीनिंगमध्ये नाओमिका सरनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
नाओमिका सरन आजी डिंपल कपाडियासोबत स्कायफोर्स चित्रपट पाहण्यासाठी आली होती. आजीला धरून ती ज्या पद्धतीने चालत होती, त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या.
चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये, नाओमिका तिच्या आजी डिंपलचा हात धरून तिची काळजी घेताना दिसली. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
नाओमिकाच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. ती आजी डिंपल कपाडियासोबत तिचे काका अक्षय कुमार याचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचली होती.
राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियासोबत दुसरं लग्न केलं होतं. डिंपल कपाडिया यांना दोन मुली आहेत. रिंकी खन्ना आणि ट्विंकल खन्ना.
नाओमिका ही रिंकी खन्नाची मुलगी आहे.
राजेश खन्ना यांच्या नातीचा ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.