UT 69 Trailer Out : राज कुंद्राच्या UT 69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) हा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे फारच चर्चेत होता.(Photo Credit : Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणामुळे अटक केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये राज कुंद्रला जामीन देखील मंजूर झाला.(Photo Credit : Manav Manglani)
राज कुंद्रा हा आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.(Photo Credit : Manav Manglani)
राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. (Photo Credit : Manav Manglani)
राज हा आर्थर रोड जेलमध्ये जातो. आर्थर रोड जेलमध्ये राज कुंद्राला कोण-कोणते अनुभव येतात. या सर्व गोष्टी UT 69 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. (Photo Credit : Manav Manglani)
तुरुंगामधील इतर कैदी राजला कशी वागणूक देतात? हे देखील UT 69 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. (Photo Credit : Manav Manglani)
राज कुंद्रानं UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझे आयुष्य रोलर कोस्टरसारखे होते. (Photo Credit : Manav Manglani)
शिल्पा शेट्टीनं देखील UT 69 या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत म्हंटले आहे की, ऑल द बेस्ट कुकी, तू एक धाडसी माणूस आहेस. (Photo Credit : Manav Manglani)
राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. (Photo Credit : Manav Manglani)
21 सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाल्यानंतर राज कुंद्रा हा चेहऱ्यावर मास्क घालूनच विविध कार्यक्रमाला हजेरी लावत होता.(Photo Credit : Manav Manglani)