Rashmi Thackeray : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे, टेंभी नाका देवीचे दर्शन आणि आरती
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका देवीच्या दर्शनाला हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मी ठाकरे यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसोबत टेंभी नाका देवीचे दर्शन घेतलं आणि आरती केली.
रश्मी ठाकरे दरवर्षी या देवीच्या दर्शनाला ठाण्यात येतात. त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि महिला पदाधिकारी होत्या.
राजन विचारे यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी रश्मी ठाकरे यांना टेंभी नाका देवीच्या दर्शनाचे निमंत्रण दिलं होतं.
त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाण्याऱ्या ठाण्यात हजेरी लावली.
ठाण्याच्या टेंभी नाका देवीची चर्चा सर्वाधिक असते. ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व मोठं आहे.
शिवसेनेमध्ये (ShivSena) पडलेल्या फुटीनंतर या ठिकाणच्या नवरात्रीची जोरदार चर्चा असते.
धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव म्हणजेच टेंभी नाका इथला नवरात्र उत्सव. 1978 साली या उत्सवाची सुरूवात झाली.
त्यानंतर आजतागायत देवीच्या या नवरात्रीचा कार्यक्रम सुरू आहे.