'या' सौंदर्यवतीच्या प्रेमात देह-भान हरपून बसलेले राज कपूर; तिच्या दुसऱ्या लग्नानं पुरते तुटले, सिगारेटनं हातावर चटके दिले...
मीडिया रिपोर्ट्सनुसार असं सांगितलं जातं की, राज कपूर बॉलिवूडमधल्याच एका सौंदर्यवतीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांचं तिच्यावर एवढं प्रेम जडलं होतं की, त्यांनी त्या सौंदर्यवतीसाठी स्वतःचे हातही जाळून घेतले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज कपूर यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील बेताज बादशाह म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या अभिनयानं चाहते भलतेच प्रभावित व्हायचे. खरं तर त्यांनी बनवलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या चित्रपटांशी संबंधित नाहीतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या सौंदर्यवतीबाबतचा एक किस्सा सांगणार आहोत.
खरं तर, राज कपूर यांचा हा किस्सा हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्यवती, ज्यांच्या सौंदर्यानं कित्येक घायाळ व्हायचे, अशा त्या ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्याशी संबंधित आहे. आवारा, श्री-420, अनारी, चोरी-चोरी या चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र दिसली होती.
यादरम्यान दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या जवळ आले. त्यावेळी दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं होतं. तसेच, दोघांच्या प्रेमाच्या चर्चा बॉलीवूडमध्ये खूप ऐकायला मिळाल्या होत्या.
पण त्यानंतर अचानक राज कपूर आणि नर्गिस यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. या अभिनेत्रीनं राज कपूर यांना सोडून सुनील दत्त यांच्यासोबत लग्नगाठ बांधल्याचं बोललं जातं.
नर्गिस यांनी अचानक केलेल्या लग्नानं राज कपूर पुरते हादरुन गेले. लेखक मधु जैन यांच्या 'द कपूर्स: द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकातही याचा उल्लेख करण्यात आला आहे.
पुस्तकात नमूद करण्यात आल्यानुसार, राज कपूर यांनी एका पत्रकाराला आपली व्यथा सांगितली होती.
नर्गिसच्या लग्नानंतर आपली फसवणूक झाल्याचं आपल्याला वाटत असल्याचं अभिनेत्यानं पत्रकाराला सांगितलं होतं.
नर्गिसच्या लग्नाचा राज कपूर यांना इतका धक्का बसला होता की, त्यांनी सिगारेटनं स्वतःचाच हात जाळल्याचंही या पुस्तकात सांगण्यात आलं आहे.
खरं तर हे सर्व राज कपूर यांना स्वप्नासारखं वाटत होतं. त्यामुळेच नर्गिसचं लग्न दुसऱ्याशी झालं आहे, हे स्वतःलाच पटवण्यासाठी आणि भानावर आणण्यासाठी त्यांनी आपले हात जाळल्याचं पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)