In Pics : 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' उपक्रमात राहुल देशपांडे कुटुंबीयांसोबत झाला सहभागी
पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' हा इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी विशेष असा उपक्रम हाती घेण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आपल्या कुटुंबीयांसोबत म्हणजेच पत्नी नेहा आणि मुलगी रेणुका समवेत बाप्पाची कागदी मूर्ती रंगवून सहभागी झाले.
उपक्रमांतर्गत रंगविण्यात येणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून, त्या 80% कापूस-कागदाचा लगदा आणि 20% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात.
राहुल देशपांडे उपक्रमासंदर्भात म्हणाला,पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रंगविण्याचा हा उपक्रम माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे.अलीकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांमध्ये बरीच जागरुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
राहुल देशपांडे पुढे म्हणाला,आजच्या पिढीमध्ये 'माझी पृथ्वी वाचविण्यासाठी माझ्या परीने शक्य ती गोष्ट करेन' ही भावना जागृत झाली आहे.
'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या उपक्रमात 600 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
येत्या काही दिवसात महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या उपक्रमात गायक राहुल देशपांडेने सहकुटुंब पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगवली.
'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' या उपक्रमातील बाप्पाची कागदी मूर्ती रंगवतानाचे राहुल देशपांडेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.