प्रियांका चोप्रा ते शिल्पा शेट्टीपर्यंत कोविड संकटात गरजूंना मदत करणाऱ्या देसी गर्ल
आपला देश सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशात प्रचंड कहर सुरु झालाय. दररोज प्रत्येक राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. ज्यामुळे देशात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक बॉलिवूड स्टार गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. यामध्ये प्रियंका चोप्राच्या फंडर्स पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर रुग्णालये आणि औषधांसंदर्भात बरीच महत्वाची माहिती शेअर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजने नुकतेच मुंबईतील अनेक भुकेल्या लोकांना जेवण दिले. यासह तिने आपली यू ओन्ली लाईव वन्स (YOLO) ही संस्था सुरू केली. ज्याद्वारे ती गरजू लोकांना मदत करेल.
अभिनेत्री अनुष्का शर्मानेही भारतात कोरोना महामारीत मदत कार्यासाठी मोहिमेची घोषणा केली आहे. यासाठी विराटसोबत तिने दोन कोटींची देणगी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर जसे की हॉस्पिटल्सचा फोन नंबर, औषधे, एनजीओ इत्यादी महत्वाची माहिती लोकांशी शेअर करत आहे.
अलीकडेच कोरोनातून बरी झालेली अभिनेत्री भूमी पेडणेकरने प्लाझ्मा देणगीदारांची माहिती इतरांना देण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. भूमी लोकांना प्लाझ्मा दान करण्याबद्दल जागरूक देखील करीत आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही आपल्या एका संस्थेच्या मदतीने 27 ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर दिले आहेत.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनासने कोरोनाशी लढण्यासाठी मदतनिधी उभारला आहे. यासोबतच या वाईट काळात भारताला मदत करण्याचे आवाहनही तिने इतर देशांना केलं आहे.
शिल्पा शेट्टी यांनी 'रिपोर्ट हंगर - खाना चाहिए फाउंडेशन' सुरू केलं आहे. जे गरजू लोकांना शिजविलेले अन्न किंवा रेशन वस्तू देण्याचे काम करते.
सुष्मिता सेन यांनी मुंबईत ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. यासह, ती दिल्लीत ऑक्सिजन पोहोचविण्याची तयारी करत आहे.