PHOTO | 'मी व्हायरसला संपवणार', कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कंगनाचा निर्धार
आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौत सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपला ध्यानधारणा करतानाचा एक फोटो शेअर करत कंगनाने सांगितलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. आपण हिमाचल प्रदेशमधून बाहेर पडणार होतो त्यावेळी कोरोना चाचणी केली आणि आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं तिने सांगितलं.
आपल्याला कोरोनाची लागण झाली असून हिमाचल प्रदेशमध्ये क्वॉरन्टीन असल्याची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.
पोस्ट शेअर करत कंगनाने लिहिलंय की मी स्वत:ला क्वॉरन्टीन करुन घेतलंय. मला माहित नव्हतं की हा व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत आहेत. आता मी त्याला संपवणार आहे.
कंगना म्हणते, आपण कोणीही अशा गोष्टींना थारा देऊ नका. जर आपण या गोष्टीला घाबरलो तर ते आपल्याला जास्त घाबरवतील. कोरोना हा फक्त एक फ्लू आहे, ज्याने काही लोकाच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. आपण त्याला संपवून टाकू.