Prasad Oak Manjiri Oak : अबोला...भांडण ते लग्न; प्रसाद-मंजिरीचा 25 वर्षांचा सुखी संसार

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक त्याची बायको मंजिरी यांच्या लग्नाला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेकदा सोशल मीडिया पोस्टवरून या दोघांचं एकमेकांवरील प्रेम दिसून येतं.

अभिनयविश्वात पदार्पण करण्याआधी प्रसाद एक अभिनयाचा वर्कशॉप घेत होता. या वर्कशॉप मध्ये अभिनय शिकायला मंजिरी देखील यायची.
वर्कशॉपदरम्यान मंजिरी आणि प्रसादची चांगली मैत्री झाली.
मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 7 जानेवारी 1998 रोजी ते लग्नबंधनात अडकले.
आजच्या दिवशी मंजिरीने सोशल मीडियावर प्रसादसाठी खास पोस्ट करत लिहिलं आहे कि, 'प्रिय प्रसाद ..९३ साली आपली खऱ्या अर्थानी “प्रेमाची गोष्ट “ सुरू झाली . अर्थात त्याआधी तू मला बराच काळ “अधांतर” ठेवलं होतंस. आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही दिवस “रणांगण” तापलं होतं...'
मंजिरीने प्रसादच्या आतापर्यंतच्या सर्व नाटकांची नावं गुंफून त्यांच्या सहजीवनाबद्दल खास पोस्ट लिहिली आहे.
मंजिरीच्या या पोस्टवर प्रसादच्या कमेंटने मात्र लक्ष वेधलं आहे.
त्याने लिहिलं आहे,तूच होतीस 'कच्चा लिंबू', तूच झालीस आपल्या मुलांची 'हिरकणी', तूच आहेस माझी 'चंद्रमुखी' असंच आनंदात जगू 'हाय काय नाय काय.
मंजिरीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.