PHOTO : पुढील दोन दिवस मुंबई, पुण्यातील हवा प्रदूषित राहणार
मुंबईतील हवा मागील दोन दिवसांपासून अतिशय वाईट श्रेणीत मोडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुढील दोन दिवस मुंबईचा एक्यूआय 300 पारच राहणार, असा अंदाज हवा गुणवत्ता निरीक्षण करणारी संस्था सफरने वर्तवला आहे.
र पुण्यातही हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत असून इथला सरासरी एक्यूआय 215 च्या वर आहे.
त्यामुळे पुढील दोन दिवस मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदूषित राहणार असल्यांचा अंदाज सफरने व्यक्त केला.
धुलिकणांचे प्रमाण वाढल्याने दोन्ही शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे.
आरोग्याच्या दृष्टीने मुंबई, पुण्यातील हवेची पातळी धोकादायक बनत आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे तसंच थकवा जाणवत आहे.
त्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी, शारीरिक परिश्रमाचे काम टाळावे, जास्त वेळ बाहेर राहणे टाळावे, सोबतच बाहेर पडत असल्यास मास्कचा वापर करावा, असा सल्ला दिला जात आहे.
मुंबईत चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आलं आहे.
तर तिकडे पुण्यात आळंदीमधील हवा सर्वात जास्त प्रदूषित असल्याचं स्पष्ट झालं आहे.