Alaya F : पूजा बेदीच्या लेकीचा घायाळ करणारा अंदाज, टोन्ड फिगरवर चाहते फिदा
स्टार किड अलाया फर्निचरवाला हिने 2020 अभिनेता सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा चित्रपट मोठ्या पडद्यावर काही खास कमाई करु शकला नसला, तरी या चित्रपटातील अलायाच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनं जिंकलं.
पहिल्याच चित्रपटासाठी अलायाने पुरस्कार जिंकले. पूजा बेदीची लेक अलाया पडद्यावर जरी नवीन चेहरा असली तरीही ती सोशल मीडिया सेन्सेशन आहे.
अलायाचा जन्म 28 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. ती सध्या 24 वर्षांची आहे.
अलाया बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी आणि फरहान फर्निचरवाला यांची मुलगी आहे. अलायाला ओमर आणि झान असे दोन भाऊ आहेत.
पारसी कुटुंबातील अलायाचा जन्म आणि शिक्षण मुंबईमध्ये झाला. तिने न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीमधून ॲक्टिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
अलाया तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर योगा आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत.
अलाया लवकरच कार्तिक आर्यनसोबत आगामी 'फ्रेडी' चित्रपटात झळकणार आहे.
अलाया तिची स्टाईल आणि फिटनेसवर खास लक्ष देते.
अलायाचा योगाची आवड आहे. ती नेहमी इंस्टाग्रामवर त्यासंदर्बात पोस्ट शेअर करत असते.