परीचा पती, शंकराचार्यांच्या चरणी; राघव चड्ढा अन् परिणी चोप्राकडून अविमुक्तेश्वरानंदांचे स्वागत
जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी शनिवारी आपचे खासदार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या निवासस्थानी भेट दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजधानी दिल्लीत राघव चड्ढा व परिणीती यांचे घर आहे, येथील घरी स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी भेट घेऊन काही वेळ दिला. सर्वांना आशीर्वाद देऊन ते निघून गेले.
अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या आगमनासाठी चड्ढा पती-पत्नीने चांगलीच तयारी केली होती. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावरही फुले अंथरली होती.
राघव चड्ढा यांनी अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या स्वागतासाठी घरासमोरील रस्त्यावरच लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. महाराजांबद्दलची अपार श्रद्धा चड्ढा कुटुंबीयांकडून दिसून आली.
परिणीत व राघव यांनी त्यांच्या निवासस्थानी देखील अविमुक्तेश्वरानंद महाराजांची मनोभावे सेवा व विधीवत पूजा केल्याचे फोटोज आता सोशल मीडियातून समोर आले आहेत.
राघव यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता तर परिणीतीने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता, यासह त्यांचा मित्रपरिवार व नातेवाईकही महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.
दरम्यान, यापूर्वी अविमुक्तेश्वर महाराजांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानीही भेट दिली आहे.