भारतातील पवित्र नद्यांमध्ये रात्री स्नान करण्यास मनाई? कारण तुम्हाला माहितीय...?
पुरातन काळापासून भारतात नद्यांना पवित्र मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार, देशातील पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं आपण आपल्या आयुष्यात केलेली अनेक पापं धुवून निघतात आणि मन शुद्ध होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या देशात नद्यांना मोक्षदायिनी म्हटलं जातं. काही खास प्रसंगी या नद्यांमध्ये स्नान करणं अत्यं शुभ मानलं जातं, परंतु, तुम्हाला माहितीय का? रात्री या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास मनाई केली जाते.. कारण माहितीय? जाणून घ्या...
हिंदू धर्मातील धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीची वेळ अशुभ मानली जाते. अनेकदा आपल्या घरातील थोरामोठ्यांकडून रात्री बाहेर न पडण्याचा, रात्रीच्या वेळी नदीकाठी न जाण्याचा सल्लाही दिला जातो.
असं म्हणतात की, रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्तिंचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं नकारात्मक उर्जेचा प्रभाव शरीरावर होऊ शकतो.
धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार, देव रात्रीच्या वेळी विश्राम करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं म्हणजे, देवतांचा विश्राम भंग असतो. याव्यतिरिक्त काही धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी नद्यांमध्ये स्नान केल्यानं पितृदोष लागू शकतो.
धार्मिक बाबींप्रमाणेच काही वैज्ञानिक कारणंही आहेत. वैज्ञानिक कारणानुसार, हल्ली नद्यांचं पाणी अत्यंत प्रदूषित झालं आहे. रात्रीच्या वेळी पाण्याची गुणवत्ता आणखी खराब होते. अशातच प्रदूषित पाण्यानं स्नान केल्यामुळे त्वचा रोग आणि इतर आजार होऊ शकतात.
याव्यतिरिक्त रात्रीच्या वेळी नद्यांमध्ये राहणारे जलचर प्राणीही सक्रिय होतात. या जलचर प्राण्यांचाही धोका संभवतो. त्यासोबतच रात्रीच्या वेळी तापमान कमी असतं आणि नदीचं पाणी थंड असते. थंड पाण्यात स्नान केल्यानं आरोग्याच्या अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. त्यामुळेही रात्रीच्या वेळी नद्यांमध्ये आंघळ करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो.
तसेच, रात्री अंधार असतो, त्यामुळे नदीत बुडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी नदीपात्रात आंघोळीसाठी जाणं धोक्याचं ठरतं.
काही नद्यांच्या आसपास वन्य प्राण्यांचा धोका. रात्रीच्या वेळी हे प्राणी हल्ला करण्याचा धोका वाढतो.
(टीप : वर सांगण्यात आलेल्या गोष्टी केवळ माहिती म्हणून देत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)