Halloween 2024: 'स्त्री 2' , 'मुंज्या' आणि 'भूल भूलैया 2'; 'या' हॅलोवीनला OTT वर हॉरर फिल्म्स करा एन्जॉय!
तुम्ही तुमचा हॅलोविन एखादा हॉरर मूव्ही पाहून तुम्ही साजरा करू शकता. पण कोणता मूव्ही पाहाल? OTT वर असलेल्या बेस्ट बॉलिवूड हॉरर चित्रपटांबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App31 ऑक्टोबर रोजी जगभरात हॅलोविन साजरा केला जाणार आहे. पूर्वी हा सण परदेशापुरताच मर्यादित होता. पण आता भारतातही लोक हॅलोविन साजरा करू लागले आहेत. या दिवशी लोक भूतांच्या गेटअपसह पार्टी करतात. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घरी हॅलोविन सेलिब्रेट करण्याचा विचार करत असाल तर, ओटीटीवरचे काही हॉरर चित्रपट तुम्ही पाहू शकता.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री 2' या वर्षी 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या हॉरर कॉमेडीनं बॉक्स ऑफिसवर चांगलीच दहशत निर्माण केली आणि चांगला गल्लाही जमवला. हा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट चित्रपट आहे. तुम्ही या हॅलोविन सेलिब्रेट करताना Stree 2 पाहू शकता. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
कमी बजेटमध्ये बनलेला शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्याही सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे, हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
कार्तिक आर्यन 1 नोव्हेंबरला 'भूल भुलैया 3' चित्रपटगृहात झळकणार आहे. त्याआधी, हॅलोविनच्या निमित्तानं तुम्ही या फ्रँचायझीच्या भूल भुलैया 2 चा आनंद घेऊ शकता. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
2024 साली प्रदर्शित झालेला तुंबाड, 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. हा एक जबरदस्त हॉरर चित्रपट आहे. हॅलोविन पार्टीमध्ये तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. तुम्ही प्राईम व्हिडीओ OTT वर याचा आनंद घेऊ शकता.
अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर 'शैतान' या चित्रपटाचाही या वर्षीच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये समावेश आहे. काळ्या जादूवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या हॅलोविनमध्ये तुम्ही हा चित्रपट तुमच्या वॉच लिस्टमध्ये देखील समाविष्ट करू शकता. आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्म Netflix वर याचा आनंद घेता येईल.
2002 मध्ये विक्रम भट्ट दिग्दर्शित 'राझ' हा चित्रपटही खूप गाजला होता. या चित्रपटात बिपाशा बसू आणि दिनो मोरिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही आजही घाबराल. हे ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
आर. माधवन स्टारर 13B 2009 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपटही भयावह घटनांनी भरलेला आहे. तुम्ही ते OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hot Star वर पाहू शकता.