उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, पण अजुनही महायुती, मविआचं जागावाटपाचं भिजत घोंगड; मोठा फटका बसणार?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही संपली असली, तरी राज्यातील सुमारे 15 जागांवर अद्याप स्पष्टता नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसनं MVA मध्ये 103 उमेदवार उभे केले आहेत, तर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांनी 87 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. येथे 11 जागांवर गूढ कायम आहे.
भाजपनं आतापर्यंत 152, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं 52 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 80 उमेदवार उभे केले आहेत. त्यात त्यांनी छोट्या मित्रपक्षांना दिलेल्या जागांचाही समावेश आहे.
भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनीही शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबादेवीतून उमेदवारी दाखल केली. नावाची घोषणा झाल्यानंतरही भाजपच्या सदस्यांमध्ये त्या जागेवरून निवडणूक लढवण्याची स्पर्धा दिसून आली.
विरोधकांच्या छावणीत अनेक आठवड्यांच्या गदारोळानंतर, जागांवर उमेदवार देण्याबाबत संभ्रम असताना, सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीला आपल्या बंडखोरांची चिंता आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते पक्ष बदलून इतर पक्षांतून निवडणूक लढवत आहेत, तर काही अपक्ष म्हणून सामील झाले आहेत.
निवडणूक अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. सर्वात चर्चेचा विषय ठरला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी भरलेले दोन उमेदवारी अर्ज.
मानखुर्द मतदारसंघातून त्यांनी दोन अर्ज दाखल केले होते. एक अपक्ष म्हणून आणि दुसरा राष्ट्रवादीचा सदस्य म्हणून, अशातच पक्षानं त्यांना मुदतीच्या काही मिनिटं आधी पाठिंबा दिला.