Property Rights: आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा हक्क असतो? काय सांगतो नियम?
अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे, वडिलोपार्जित मालमत्तेवर नातवाचा कायदेशीर हक्क असतो का? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवडिलोपार्जित मालमत्तेवर नातवाचा कायदेशीर हक्क असतो. याबाबत काही वाद असल्यास किंवा आपत्ती असल्यास दिवाणी न्यायालयात जाऊ शकतात.
लोकांना अनेकदा मालमत्तेवरील हक्क आणि दाव्यांच्या नियमांची कायदेशीर समज आणि ज्ञान नसतं. त्यामुळे मालमत्तेशी निगडीत नियम आणि अधिकारांची योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
वडिलोपार्जित संपत्तीबाबत सर्वजण आपापले कायदेशी दावे करू शकतात. यापैकीच एक म्हणजे, आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा हक्क असणं. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात...
आजोबांनी स्वतःच्या कष्टानं कमावलेल्या संपत्तीवर नातवाचा कायदेशीर अधिकार नसतो. आजोबा त्यांची मालमत्ता त्यांना पाहिजे त्या व्यक्तीला देऊ शकतात.
पण, जर आजोबांचं मृत्यूपत्र बनवलेलं नसेल आणि त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या तात्काळ किंवा प्रथम प्राधान्यानुसार जो कायदेशीर वारस असेल... जसं की पत्नी, मुलगा किंवा मुलगी त्यांचा या मालमत्तेवर हक्क असतो.
वडिलोपार्जित संपत्तीवर नातवाचा कायदेशीर हक्क आहे. याबाबत काही वाद असल्यास दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो.
पूर्वजांकडून वारसा हक्कानं मिळालेल्या संपत्तीला वडिलोपार्जित मालमत्ता किंवा संपत्ती असं म्हणतात. जसं की, आजोबांकडून आजोबांना, आजोबांकडून वडील आणि नंतर वडिलांकडून नातवाकडे. या मालमत्तेबाबतचे नियम स्व-अधिग्रहित मालमत्तेपेक्षा काहीसे वेगळे आहेत.
(वर देण्यात आलेल्या सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही)