Katrina 'भूत' तर Varun 'भेडिया', नोव्हेंबरमध्ये रिलिज होणार 8 चित्रपट
Film Releasing in November : चित्रपट चाहत्यांसाठी नोव्हेंबर महिना व्यस्त असणार आहे. कारण, या महिन्यात आठ मोठे चित्रपट रिलिज होणार आहेत. कतरिना कैफ भूत होणार आहे तर वरुन धवन भेडिया (लांडगा) होणार आहे. प्रेक्षकांसाठी हा महिना अतिशय व्यस्त असणार आहे... पाहूयात नोव्हेंबर महिन्यात रिलिज होणाऱ्या चित्रपटांबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर स्टार्रर फोन भूत हा चित्रपट चार नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. हॉरर कॉमिडी चित्रपट आहे.
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच 'भेडिया' (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी हा हॉरर कॉमिडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेननची (Kriti Sanon) जोडी पहिल्यांदाच 'भेडिया' (Bhediya) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी हा हॉरर कॉमिडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूचा 'यशोधा' हा चित्रपट हिंदी, कन्नड, मल्याळम आणि तामिळ भाषेत रिलिज होणार आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
अजय देवगनचा 'दृष्यम-2' हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
जान्हवी कपूर स्टारर 'मिली' हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'डबल एक्सएल' हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर रिलिज होणार आहे.