PHOTO : राज्यभरातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल! विविध ठिकाणी पर्यटकांनी गर्दी

दिवाळी आणि त्यानंतर शनीवार रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे (Holidays) पर्यटनस्थळे (Tourist Places) हाऊसफुल्ल झाली आहेत.

Continues below advertisement

Tourists

Continues below advertisement
1/12
सलग सुट्टीचा आनंद, मौज मज्जा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत.
2/12
सिंधुदुर्ग किला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मालवण जेटी, चिवला समुद्र किनारा, रॉक गार्डन, तारकर्ली, देवबागसह सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. जलक्रीडा पर्यटनाचाही पर्यटक आनंद लुटत आहेत.
3/12
कोकणच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
4/12
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची रीघ कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आहे.
5/12
येवा कोकण आपलाच आसा याचा प्रत्येय कोकणात येणाऱ्या पर्यटकांना येत आहे. तशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यासोबत सुरक्षित पर्यटन देखील त्यांनी अनुभवलं.
Continues below advertisement
6/12
सलगच्या सुट्या असल्या तरीदेखील तीन दिवसांचं बुकिंग फुल आहे.
7/12
कोकणातील समुद्र किनारे, गणपतीपुळे अशा ठिकाणांना पर्यटकांची पसंती आहे. त्यामुळे सलगच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी नियोजन करत पर्यटक फिरत आहेत. यात समुद्र किनारे, किल्ले, मंदिर अशा ठिकाणी पर्यटकांचा ओघ आहे. त्यामुळे कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.
8/12
कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या पालघर मधील पर्यटन व्यवसायाला आता काही प्रमाणात सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.
9/12
सध्या सुरू असलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच आलेला वीकेंड यामुळे पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
10/12
मुंबई, ठाणे, नाशिक या महानगरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर सध्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
11/12
दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच आलेला वीकेंड यामुळे पालघर मधील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
12/12
केळवे पर्यटन स्थळी असलेला उथळ, सपाट समुद्रकिनारा आणि याच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल घनदाट जंगल यामुळे येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय.
Sponsored Links by Taboola