सुझान खान आणि हृतिक रोशन का वेगळे झाले? आजपर्यंत खरे कारण सापडले नाही

साल 2000 मध्ये बॉलीवूडला एक नवीन स्टार मिळाला. चित्रपटाचे नाव होते 'कहो ना प्यार है' आणि या चित्रपटातून हृतिक रोशनने डेब्यू केला होता. चित्रपट रिलीज होताच कमाल झाली अन् ऋतिक प्रत्येकाच्या मनामनात बसला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पण, हृतिकच्या मनात ज्या मुलीने घर केलं ती सुझान खान होती. तिला पहाताच हृतिक ह्रदय देऊन बसला. त्यावेळी हृतिकची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. तोपर्यंत फक्त हृतिक रोशनचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण तरीही सुझानच्या प्रेमात वेडा झालेल्या हृतिकने लग्नाचा निर्णय घेऊन टाकला.

ज्या वर्षी हृतिकचा पहिला चित्रपट रिलीज झाला, त्याच वर्षी हृतिक आणि सुझानचे लग्न झाले आणि हृतिकने हजारो मुलींची मने तोडली. पण मग या दोघांमध्ये असे काय झाले की काही वर्षांनी त्यांचे मार्ग वेगळे झाले.
20 डिसेंबर 2000 रोजी हृतिक आणि सुझान यांनी सात फेऱ्या मारल्या आणि 14 वर्षानंतर 2014 मध्ये ते कायदेशीररित्या वेगळे झाले. पण का? खास गोष्ट म्हणजे त्यांच्या वेगळे होण्याचे खरे कारण आजपर्यंत कळू शकलेले नाही.
यामुळे, हे संबंध बिघडण्यामागील सर्व कारणांची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा आहे. असं म्हणतात की काईट्स चित्रपटाची अभिनेत्री बार्बरा मोरे आणि क्रिशमधील कंगना रनौत यांच्यासोबत हृतिकच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे आणि म्हणूनच सुझान हृतिकपासून विभक्त झाली आहे.
आत्तापर्यंत, या दोघांनीही आपल्यापासून विभक्त होण्याचे कारण कधीही शेअर केले नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये ज्या चर्चा आहेत त्या फक्त मनाच्या गोष्टी आहेत. खरं कारण काय आहे हे दोघांनाच माहिती आहे.
पण, त्यांच्या विवाहित नात्यात जेव्हढं सौंदर्य होतं, तेव्हढचं तुटलेल्या नात्यातही पहायला मिळते. आजही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत, ते मुलांसाठी एकत्र वेळ घालवतात. सुझानसुद्धा रोशन कुटुंबाच्या प्रत्येका कार्यात सहभागी असते.