Nitin Desai Death: 4 राष्ट्रीय पुरस्कार विजेते; नितीन देसाई यांच्या नावावर सर्वात मोठा फिल्म सेट बनवण्याचाही विक्रम
कर्जतमधील एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्येच आत्महत्या केली आहे. त्यांनी 250 जाहिराती, 180 चित्रपट आणि सुमारे 100 टीव्ही शोमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितीन देसाईंचं काम इतकं चांगलं होतं की त्यांना त्यांच्या कामासाठी 4 राष्ट्रीय आणि 9 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये भारतातील सर्वात मोठा थीम पार्क बांधण्यात आला आहे.
मे महिन्यात एका जाहिरात संस्थेने नितीन देसाईंवर 51 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
नितीनने कामावर रुजू करून घेतल्यानंतर पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता, मात्र नितीन देसाईंनी हे सर्व आरोप फेटाळले होते.
सध्या तरी त्यांच्या आत्महत्येचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही.
त्यांच्या या निर्णयाने त्यांचे चाहते खूप निराश झाले आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.