Rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काही भागात या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटकाही बसला आहे. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून देखील गेल्या आहेत.
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देम्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.