Amboli Rains : सिंधुदुर्गातील आंबोलीत 45 दिवसांत तब्बल आतापर्यंत 4500 मिमी पाऊस
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
02 Aug 2023 10:13 AM (IST)
1
राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. जून महिन्याच्या अखेरपासून पावसाला दमदार सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गेल्या 45 दिवसांत महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत तब्बल 4500 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
3
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत आंबोलीत पावसाची विक्रमी नोंद होऊ शकते.
4
आंबोली परिसरात दरवर्षी सरासरी 9000 मिमी ते 11000 मिमी पावसाची नोंद होते.
5
देशातील सर्वात जास्त पाऊस कोसळणारे ठिकाण म्हणून 'चेरापुंजी'ची ओळख आहे.
6
चेरापुंजीनंतर देशात सर्वाधिक पाऊस महाराष्ट्राच्या आंबोली घाटात कोसळतो म्हणूनच आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं.
7
सिंधुदुर्गातील पावसामुळे आंबोली, सावडाव, मांगेलीसह सर्व धबधबे गर्दीने फुलून गेले होते.