PHOTO : बॉलिवूडमधील 'या' जोड्यांना सिल्व्हर स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक
अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा : एकेकाळी अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या अफेयरच्या खूप चर्चा झाल्या. ही गोष्ट ट्विंकल खन्नाला माहिती झाल्यानंतर तिनं अॅक्शन घेत अक्षयला समजावलं. यानंतर ही जोडी सोबत दिसली नाही. दोघांनी ऐतराजमध्ये सोबत काम केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऋतिक रोशन आणि कंगना रनौत : या दोघांनी एकमेकांसोबत दोन चित्रपट केले. दोघांच्या संबंधाची खूप चर्चाही झाली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की ऋतिकने कंगनाला केस देखील केली होती.
शाहिद कपूर आणि करिना कपूर खान : या दोघांनी एकमेकांना डेट केलं आहे. जब वी मेट चित्रपटादरम्यान दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर दोघे कधी एकत्र दिसले नाहीत. येणाऱ्या काळातही दोघे एकत्र दिसतील अशी शक्यता नाही.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय : या दोघांनी लव्ह स्टोरी हम दिल दे चुके सनम चित्रपटापासून सुरु झाली. नंतर काही कालावधीत ब्रेकअपही झालं. आता हे दोघं एकमेकांसोबत काम करणं सोडा, एकमेकांना पाहातही नाहीत.
अमिताभ बच्चन आणि रेखा. या दोघांनी एकमेकांसोबत काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी एकत्र केलेले सर्व सिनेमे हिट झाले. विशेषत: सिलसिला. मात्र सिलसिलानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. सिनेमा सोडा एका मंचावरही ते कधी दिसले नाहीत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -