‘नेटफ्लिक्स’ची ग्रँड पार्टी; रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींच्या लूकनं वेधलं अनेकांचे लक्ष
काल (18 फेब्रुवारी) नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून एक ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी खास लूकमध्ये हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) नेटफ्लिक्सच्या पार्टीला हजेरी लावली. रेड कुर्ता आणि ब्लॅक जीन्स असा लूक आमिरनं पार्टीसाठी केला होता.
अभिनेत्री मनीषा कोयरालानं (Manisha Koirala) नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी ब्लू को-ऑर्ड सेट आणि पिंग बॅक असा लूक केला होता.
आश्रम आणि शी या वेब सीरिजमुळे अदिती पोहनकरला (Aaditi Pohankar) विशेष लोकप्रियता मिळाली. नेटफ्लिक्सवरील शी या सीरिजमधील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आदितीनं गोल्डन ग्लिटर ड्रेस आणि ब्लॅक हिल्स असा क्लासी लूक नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी केला होता.
अनिल कपूर (Anil Kapoor) आणि त्यांची मुलगी रिया कपूर यांनी देखील नेटफ्लिक्सच्या पार्टीला खास लूकमध्ये हजेरी लावली. त्यांनी पार्टीसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
अभिनेत्री अदिती राव हैदरीनं देखील नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी खास लूक केला होता.
अभिनेत्री भूमी पेडणेकरनं ट्यूब टॉप आणि स्कर्ट असा क्लासी लूक नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी केला होता.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते. नेटफ्लिक्सच्या पार्टीसाठी देखील तिनं क्लासी आणि ग्लॅमरस लूक केला.
साऊथ स्टार दग्गुबाती आणि वेंकटेश दग्गुबाती यांनी नेटफ्लिक्सच्या पार्टीमध्ये हजेरी लावली.
नेटफ्लिक्सच्या पार्टीमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन आणि एकता कपूर यांनी देखील खास लूकमध्ये हजेरी लावली.