Shiv Jayanti 2023 : प्रभो शिवाजी राजा! दगडांचा आकार न बदलता रंगांची उधळण करून आकर्षक कलाकृती, सुमन दाभोलकरचं रॉक आर्ट
हातोडा आणि छणीचा वापर करून दगडापासून मूर्ती घडवलेले अनेक कलाकार तुम्ही पाहिले असतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमधील सुमन दाभोलकर या अवलियाने दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करून आकर्षक कलाकृती साकारली आहे.
शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन म्हणून सुमन दाभोलकरने सुंदर रॉक आर्ट शेअर केलं आहे.
स्टोन आर्ट साकारणारा सुमन दाभोलकरने दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्टोन आर्ट साकारून त्यांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केलं आहे.
सुमनने आतापर्यंत दगडावर 50 हून अधिक शिल्पकृती साकारल्या आहेत. त्याच्या या अनोख्या कलेचं फार कौतुक होत आहे. निसर्गात जे सहज उपलब्ध आहे त्याचा वापर करुन सुमन कलाकृती साकारतो
दगडाचा आकार न बदलता रंगाची उधळण करत साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रासह सुमनने शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह कपिल देवही साकारले आहेत.
तसेच सुमनने प्रसिद्ध अभिनेते, क्रिकेटपटू, कवी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, विविध प्राणी पक्षी यांच्याही शिल्पकृती साकारल्या आहेत.
आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्व ठिकाणी विविध कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडताना दिसत आहे.