Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engagement : नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत, साखरपुडा उरकला, कोण आहे समंथा प्रभूच्या एक्स नवऱ्याची दुसरी बायको?
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, तीन वर्षात त्यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागा चैतन्य आणि समंथाने 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकांना धक्का बसला.
वेगळं होण्याचे कारण काय, याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
नागा चैतन्य याने आता आपली प्रेयसी शोभिता धुलिपाला सोबत साखरपुडा उरकला आहे. पण, नागाची होणारी दुसरी पत्नी शोभिता आहे तरी कोण?
शोभिताचा जन्म 31 मे 1992 को आंध्र प्रदेशमधील एका तेलगू कुटुंबात झाला. शोभिताने अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
शोभिताने 2013 मध्ये 'मिस इंडिया अर्थ'चा खिताब जिंकून तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. त्याच वर्षी मिस इंडिया स्पर्धेत ती दुसरी आली होती.
यानंतर त्याने अनेक ऑडिशन्स दिल्या आणि नकारांनाही सामोरे जावे लागले. तिने 2016 मध्ये अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सैफ अली खानच्या 'शेफ' या चित्रपटातही ती दिसली होती.
मात्र, शोभिताला प्राइम व्हिडिओच्या 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर स्टारर 'द नाईट मॅनेजर' या वेब सीरिजमुळे तिच्या लोकप्रियतेत भर पडली. शोभिता ही ओटीटीवर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे.
शोभिताने 2018 साली 'टिक्का गुडाचारी' या तेलुगू चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
संमथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे अनेकदा व्हेकेशनवर एकत्र दिसले. मात्र, त्यांनी आपल्या नात्याबाबत भाष्य केले नाही.
शोभिता ही देव पटेलच्या 'मंकी मॅन'मध्ये शेवटची दिसली होती आणि ती आता वंदना कटारियाच्या 'सितारा'मध्ये झळकणार आहे.