समंथाच्या एक्स हसबंडसोबत बोहोल्यावर चढणार 'ही' अभिनेत्री; लग्नविधींना सुरुवात, ट्रेडिशनल लूकनं चाहते घ्यायाळ!
Naga Chaitanya Get Married With Sobhita Dhulipala : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर आता अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. अभिनेत्रीनं स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये शोभिता साऊथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे. ती लग्नाआधीचे विधी करताना दिसत आहे.
शोभिताच्या लूकबद्दल बोलायचं झालं, तर ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. कपाळावर टिकली, हातात बांगड्या आणि केसात गजरा माळून शोभिता खरंच खूप सुंदर दिसत होती.
फोटोंमध्ये शोभिता विधीवत लग्नापूर्वीचे विधी करताना दिसत आहे. तसेच, ती मोठ्यांचे आशीर्वादही घेत आहे.
शोभिताची मिलियन डॉलर स्माईल पाहून, नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, याच वर्षी ऑगस्ट महिन्यात शोभिता आणि नागा चैतन्यनं आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्यावेळी त्यांना लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचंही सांगितलं होतं.
शोभितासोबत नागा चैतन्य लग्नगाठ बांधणार असून त्याचं हे दुसरं लग्न असणार आहे. त्याचं पहिलं लग्न दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीमधली सुपरस्टार समंथासोबत झालं होतं.
समंथा आणि नागा यांचं लग्न 2017 मध्ये झालं होतं. पण, त्यानंतर 4 वर्षांनी त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, शोभिता प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडल आहे. शोभितानं मिस इंडिया अर्थचा किताब पटकावला होता.
शोभिता वेब सीरिज मेड इन हेवन, द नाईट मॅनेजरमधून खरी ओळख मिळाली.
त्यानंतर शोभितानं पोन्नियन सेल्वन, रमन राघव 2.0, मेजर, कुरुप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
शोभिताच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
(सर्व फोटो : @sobhitad/Instagram)